नांदेड| शहरातील श्रावस्ती भागातील रहिवाशी मारोती संभाजीराव हानवते (काकांडीकर) यांचे बुधवार दिनांक 23रोजी दुपारी 3 वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. ते मृत्यू समयी 46 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दि.24 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या श्रावस्ती नगर येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्यांच्यावर गोवर्धन घाट परिसरातील शांतीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते पत्रकार अशोक काकांडीकर यांचे लहान बंधु होत.