कुंडलवाडी/नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी परिसरात घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी २४ तासात जेरबंद, चोरीस गेलेले सर्व सोन्या चांदीचे दागीने जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १०/११/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादीचे नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथिल घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने लक्ष्मीबाई नागनाथ सुरकुटलावार वय ६० वर्ष रा.नांदेड बेस कुंडलवाडी ता. बिलोली यांच्या घरातील पाठीमागील दरवाज्याची कडी उचकटुन काढुन घरात प्रवेश करून लाकडी रॅक वरील चावी घेवुन लोखंडी संदुकातील १) कानातील सोन्याचे फुल २) सोन्याचे मुगळसुत्र ३) सोन्याचे डोरले ४) सोन्याचे सहा पान व सोन्याचे ६० मनी ५) चांदीची साखळी असा एकुन चालु दराप्रमाणे १,०५,००० रूपयाचा सोन्या चांदीचा मुद्देमाल आरोपीने चोरून नेला वगैरे फिर्यादवरून नमुद गुन्हा दाखल झाला होता.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक साहेब, भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, धर्माबाद यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनामुळे कुंडलवाडी पोलीसांनी दोन दिवसाच्या आत नमुद गुन्हयातील घटनास्थळी भेट देवुन, गुन्हयाचा बारकाईने तपास करून आरोपी निष्पन्न करून आरोपीस अटक करून आरोपी दिगांबर राम जानोळे वय ३० वर्ष व्यवसाय मिस्त्रीकाम रा. नांदेड बेस कुंडलवाडी ता. बिलोली याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला १) कानातील सोन्याचे फुल २) सोन्याचे मुगळसुत्र ३) सोन्याचे डोरले ४) सोन्याचे सहा पान व सोन्याचे ६० मनी ५) चांदीची साखळी असा एकुन चालु दराप्रमाणे १,०५,००० रूपयाचा सोन्या चांदीचा मद्देमाल जप्त केला आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक साहेब, भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली बि.टी नागरगोजे सहा. पोलीस निरीक्षक पो. स्टे कुंडलवाडी सोबत नारायण शिंदे पोउपनि पो. स्टे कुंडलवाडी पोहवा / २८२१ एस. एल चव्हाण पो. स्टे कुंडलवाडी पो.कॉ/३६४ आर.एस देशमुख पो.स्टे कुंडलवाडी यांनी केली आहे. कुंडलवाडी पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब, नांदेड यांनी कुंडलवाडी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.