नांदेड| राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा (children’s drama competition) नांदेड केंद्राच्या स्पर्धा 27 जानेवारी २०२५ पासून सुरुवात झाल्या. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात 10 वेगवेगळया केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे.


सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. बाल नाट्य स्पर्धेचे उदघाटन लेखक तथा रंगकार्मी सुहास देशपांडे, परीक्षक सौ. प्राची उदय गोडबोले, श्री. विश्वास साहेबराव दुमाने, श्री.नरेंद्र ज्ञानदेव आंगणे, बाल नाट्य स्पर्धा विजेती बालकलाकार अक्षरा डोंगरगावकर आणि बाल नाट्य स्पर्धेचे समन्वयक किरण चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कुसुम नाट्यगृह, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या एकूण 17 नाट्य संस्था या मध्ये सहभागी झाल्या आहेत.
पहिल्या दिवशी प्लॉट नंबर शून्य, आभाळ, गांधी व्हायचं आम्हाला, कस्तुरी, व्हाट्सअप चा तमाशा आणि सक्सेस ऍप ही नाटके सादर झाली.

सातत्याने २० वर्ष चालणारी ही बालनाट्य स्पर्धा आहे. प्रत्येक दिवसाला सहा बालनाट्य प्रयोग होणार असून वेळ रोज सकाळी 11 वा. ते सायंकाळी 6 वा पर्यंत प्रयोग सादर होणार आहे, नाट्य रसिकांनी याची नोंद घ्यावी. आपल्या जिह्यातील बालकलावंतांची कला पाहण्यास व त्यांना दाद देण्यास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.
