नवीन नांदेड| सिडको नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सह पालखी मार्गावर माजी मनपा उपमहापौर विनय पाटील गिरडे,शिवसेना ऊबाठा गटाचे दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीप भागिले, तालुका प्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख जितुसिंग टाक व विविध पक्षाच्या पदाधिकारी व विधीवत पुजन करून पालखी घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला, अनेक ठिकाणी या पदयात्रेचे भाविक भक्तांनी स्वागत , विधीवत पुजन केले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या या पदयात्रेत १०० भाविक भक्तांचा सहभाग असुन ६ आगस्ट रोजी सकाळी सिडको परिसरातील बिडी कॉलनी भागातून या पदयात्रेचा शुभारंभ झाला. सकाळी सिडको परिसरात पदयात्रेत पालखी घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सहभागी झाले, यावेळी साईबाबा पालखी सोहळा अध्यक्ष गणेश जैस्वाल यांनी स्वागत केले, माजी नगरसेविका प्रा. ललीत शिंदे, जयश्री जैस्वाल यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
सिडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी सुदीन बागल, रवि थोरात, रवि रायबोळे यांनी स्वागत केले. लातूर फाटा येथील साई मोटार येथे ऊबाठा शिवसेना गटाचे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक दिलीप भागिले, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख अशोक मोरे, सिडको शहर प्रमुख जितुसिंग टाक, धनराज भागिले यांनी स्वागत करून विधीवत पुजन केले व पदयात्रेत सहभाग नोंदविला. श्रावण मास निमित्ताने निघालेल्या या पदयात्रेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विविध प्रतिष्ठान पदाधिकारी, सामाजिक राजकीय शैक्षणिक यांच्या सह पत्रकार व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.