लोहा/नांदेड। लोहा येथून जवळच असलेल्या कारेगाव येथे सुसज्ज अशा लोहगड गुरुद्वारा मधे धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संत बाबा बलविंदरसिंघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
धन्ना भगत यांनी ६०८ वर्षांपूर्वी दिलेले विचार आजही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. भक्त शिरोमणी धन्ना यांनी श्रद्धेच्या जोरावर दगडात देव प्रकट केले होते. या महान भक्तांचा जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोहगड गुरुद्वारा मधे आयोजित केला होता. यानिमित भजन,कीर्तन,प्रवचन, कथा, अखंड पाठ आदि कार्यक्रम झाले. नांदेड व लोहा तालुक्यातील भक्त मंडळी मोठ्या श्रधेने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे मित जथेदार भाई ज्योतिंदरसिंघ जी यांच्या अरादास कार्यक्रमाने सोहळ्याची उत्तम सांगता झाली. गुरुद्वारा मधे लंगर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
उपस्थित कथावाचक भाई सरबजितसिंघ (बाबा लक्की),डॉक्टर बाबा हरजिंदरसिंघ, बाबा सुखविंदरसिंघ,बाबा कुलदीपसिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे सहाय्यक अधीक्षक गुरुद्वारा बोर्डाचे सहाय्यक माजी अधीक्षक सरदार रणजितसिंघ चिरगिया,सरदार ठाणसिंघ बूंगई, सरदार शरणसिंघ सोडी, सरदार सुखविंदरसिंघ हुंदल, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास मोरे,केशवराव वानखेडे, श्रेयसकुमार बोकारे यांचा यावेळी शिरोपा देउन सत्कार करण्यात आला. संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सर्वांना अशिर्वचन दिले. लोहगड गुरुद्वारा चे जथेदार बाबा प्रितपालसिंघ बंटी यांच्या सह सर्व सेवादारांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.