हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक कृष्णा चौधरी यांची बदली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, अर्धापूर येथे केल्यामुळे हिमायतनगर येथील प्रा.आ. केंद्र सरसम प्रा.आ.केंद्र चिर्चाडी येथील आशा स्वंयसेविकांना (Asha Workers) आशा योजना अंतर्गत जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या सुचनेची माहिती वेळेत प्राप्त होत नाही. त्यामुळे गावपातळीवर शासनाच्या योजनेची माहिती देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कृष्णा पांडुरंग चौधरी, तालुका समुह संघटक हे हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरुन नियुक्त झालेले आहेत. त्यांची अर्धापुर येथे प्रतिनियुक्ती केल्याने अनेक अडचणी येत आहेत. ते हिमायतनगर येथे कार्यरत असतांना जिल्हास्तरीय सर्व शासकीय योजनांची माहिती व प्रशिक्षण आम्हा आशा वर्कर्सला वेळेवर मिळत होते, पण त्यांची प्रतिनियुक्ती केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे.
ही बाब लक्षात घेता हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात पुन्हा पदस्थपणा देऊन श्री कृष्णा पांडुरंग चौधरी यांची तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर येथे झालेली प्रतिनियुक्ती तात्काळ रद्व करावी आणि त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथेच कार्यरत ठेवण्यात यावे अशी मागणी आ बाबुराव कदम कोहळीकर ( Mla Baburao Kadam) यांच्याकडे हिमायतनगर तालुक्यातील आशा स्वयंसेविका लता गंगाराम चव्हाण, सोनारी, संगिता मारोती कदम टेम्भुर्णी, सोमित्रा मानिक शिवसागर, पोटा (बु.), विद्या कैलास कोरफडे, विरसनी, पुस्पा मानिक राठोड, चिचतांडा, गीरजाबाई खोबाजी कोठेकर, सिरंजनी, लता विनायक राठोड, कोठा तांडा, सुर्यवेशी, करजी, सुलोचना ग्यानोबा बोईनवाड, कांडली (बु), सुनिता भुजंगगराव कल्यानकर, टाकराळा, गंगासागर नामदेव गायकवाड, दिघी, भुलनबाई रामराव जाधव, पोटा तांडा, आदींसह हिमायतनगर तालुक्यातील 33 गावातील आशा वर्कर्सच्या स्वाक्षऱ्या आहेत.