नांदेड l दि.2 डिसेंबर 2024 रोजी गोल्ला -गोल्लेवार यादव समाज संघटनेचे नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष तथा राष्ट्रीय यादव महासभा दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक श्री.अभिषेक जंगन्ना बकेवाड यांनी समाजाप्रती असलेले प्रेम समाज एकजुट करण्यासाठीची तळमळ हि मागील कित्येक वर्षापासुन सोशलमिडिया मार्फत दाखवत होते.पण ते तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आता समाज एकजुट करण्यासाठी एक वसाच घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्रातील समाज एकजुक करण्याबरोबरच आता थेट मैदानात उतरुन थेट तेलंगाना राज्यातील गोल्ला-गोलेवार यादव समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिच्या भेटी गाठी करत आहेत. त्यातच त्यांनी काल हैद्राबाद येथील हैद्राबाद चे माजी महापौर सौ.श्रीदेवी यादव, श्री.आर.लक्ष्मण यादव आमदार हैदराबाद, बिल्डर हैद्राबाद नामांकित उद्योजक बंबलू यादव, यादव संगम प्रदेश अध्यक्ष रामलु मैकालू यादव, प्रदेश युवक यशवंतराव गोर्ला यादव, राष्ट्रीय यादव प्रदेश अध्यक्ष तेलंगणा विजयभाई यादव,हैदराबाद शहर अध्यक्ष श्रीसेलम यादव, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र यादव, संदीप यादव यांची भेट यांची त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जावुन भेटी घेतल्या या भेटी दरम्यान त्यांनी समाज बांधवांना समाजात राहत असताना येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली आहे.
या भेटीदरम्यान तेलंगाना राज्यातील समाज बांधवांची गावोगावी संघटना तयार करण्यासाठी तेलंगाना राज्यातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार असल्याची भुमीका बकेवाड यांनी व्यक्त केली.
गोल्ला-गोल्लेवार यादव समाजात अनेक समाज बांधव हे उच्च पदावर आहेत.त्यात कोणी आमदार, खासदार, डॉक्टर, इंजिनीयर, अधिकाऱ्यांसह अनेक शासकीय व खासगी व्यवसायात अग्रेसर आहेत, पण समाजातील सामान्य माणसांना त्यांचा परिचय नाही.
त्यामुळे समाज एकत्रीत करुन समाजाचे कुठेतरी अस्तीत्व आहे हि ओळख करण्यासाठी कामं करत आहे.
अभिषेक बकेवाड
येणाऱ्या काळात गोल्ला-गोल्लेवार यादव समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आकेमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, तेलंगणा राज्या सह कर्नाटक राज्यात यादव समाजातील आमदार खासदार,मंत्री,पदाधिकारी समाज बांधवाना ची ऑपामेट घेऊन भेटण्यासाठी दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.