हिमायतनगर| हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर देवस्थानातील हनुमानाच्या मुर्तीला सतरा तोळा चांदीचा मुखवटा हैदराबाद येथील एका भक्तानी दान दिला असून. मंगळवार दिनांक 25 रोजी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीतून विधीवंत पुजा करून सोना चांदीचे कारागीर बाबूराव सकवान यांनी मुकूट बसवीला आहे.


हैदराबाद येथील भाविक राहून छाजेड यांनी सदर मुकूट दान दिले असून .खामगाव येथील चांदीचे प्रसिद्ध कारागीर यश सिल्व्हर चे मालक यश जागींड यांनी हनुमान मूर्तीचा मुकूट बनविला आहे .रविवारी माधवराव शिरफूले कामारीकर यांनी मंदीर कमेटीला मुकूट स्वाधीन केला.


यावेळी मंदीर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचद श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर गुरूजी, दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश जैन आदींसह भाविक भक्तांची उपस्थिती होती.
