Homeनांदेड'प्रतिकात्मक स्वरुपात श्री गणेश विसर्जन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !

‘प्रतिकात्मक स्वरुपात श्री गणेश विसर्जन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !

प्रतिसाद देणाऱ्या गणेश मंडळांचा प्रशासनाकडून होणार सत्कार

नांदेड| यंदा राज्यात उद्भवलेली तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी वर्तवण्यात आलेला वादळी पावसाचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने गणेशभक्तांना यंदा प्रतिकात्मक स्वरुपात श्री गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसह विसर्जन स्थळांची पाहणी केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

यंदा पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे श्री गणेश विसर्जनासाठी नदी-तलावांमध्ये पर्याप्त पाणी उपलब्ध नाही. अनेक गणेश मंडळांची श्री गणेशाची मुर्ती 20 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असून अशा मोठ्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य झाले आहे. त्यातच विसर्जनाच्या दिवशी वादळी पावसाची दाट शक्यता असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने गणेश भक्तांना यंदा मोठ्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिसाद देणाऱ्या मंडळांचा होणार विशेष सत्कार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जे गणेशोत्सव मंडळ प्रशासनाच्या या आवाहनाला मान देऊन प्रतिकात्मक विसर्जन करणाऱ्या श्री गणेश मंडळाचा समाजासमोर एक चांगला आणि आदर्श पायंडा ठेवल्याबद्दल प्रशासनाच्यावतीने विशेष सत्कार केला जाईल, असे स्पष्ट केले. 

प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन – “आम्ही विसर्जनाची पर्यायी सोय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, परंतु निसर्गाच्या मर्यादांमुळे काही अडचणी आहेत,” असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गणेशभक्तांना आणि कार्यकर्त्यांना सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाला भरभरून साथ देण्याचे आवाहन केले केले आहे. या संकटकाळात नियम पाळून उत्सव साजरा करणे हीच खरी बाप्पाची सेवा ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments