Homeनांदेडदुष्काळाच्या दारात हिमायतनगर; प्रशासन अजूनही झोपेत? पिके वाळली, शेतकरी कोलमडला

दुष्काळाच्या दारात हिमायतनगर; प्रशासन अजूनही झोपेत? पिके वाळली, शेतकरी कोलमडला

काँग्रेसचा तहसीलदारांना थेट सवाल—मुहूर्त न पाहता कोरडा दुष्काळ जाहीर करा !

हिमायतनगर,अनिल मादसवार| दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली… शेतातील उभी पिके करपली… जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला… शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला; तरीही हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन, कापूस, ऊस, उडीद, मूग, तूर, ज्वारी, मका, हळद यासह खरीप पिकांना पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका बसल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके वाळत असताना केवळ पंचनामे आणि कागदी अहवाल नकोत; तातडीने प्रत्यक्ष मदत द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस अध्यक्ष गजानन दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या पुढाकाराणे तहसीलदारां मार्फत शासनाला निवेदन देत हिमायतनगर तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १.२५ लाख रुपयांची तातडीची मदत, सर्व पिकांचा पीकविमा मंजूर करणे आणि नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने केलेल्या मागण्यामध्ये हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा! सर्व पिकांचा पीकविमा तात्काळ मंजूर करा! हेक्टरी १.२५ लाख रुपयांची मदत द्या! नवीन पीककर्ज तातडीने मंजूर करा! पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांचे शुल्क माफ करा! तालुक्यात चारा छावण्या सुरू करा! रब्बीसाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करा! आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

IMG20260923115841 दुष्काळाच्या दारात हिमायतनगर; प्रशासन अजूनही झोपेत? पिके वाळली, शेतकरी कोलमडला
oplus_0

‘मुहूर्त’ कशासाठी? शेतकऱ्यांना मदत कधी? शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना शासनाने आणि प्रशासनाने कोणत्याही औपचारिकतेची किंवा मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केली आहे. दुष्काळाचे संकट डोक्यावर असताना प्रशासनाचा विलंब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरू नये, शासनाने 5 ऑगस्टच्या मुहूर्ताची वाट पाहू नये अशी भूमिका काँग्रेसने मांडली. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन विशाल आंदोलन अथवा रूमने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आला.

यावेळी तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहर अध्यक्ष संजय माने, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जनार्दन ताडेवाड, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी ग्रामपंचायत सदस्य समद खान, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी सभापती डॉ प्रकाश वानखेडे, फेरोजखान पठाण, डॉ. अब्दुल गफ्फार, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, सुनील वानखेडे, सुभाष शिंदे, मन्नान भाई यांच्यासह काँग्रेस  पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, व शेतकरी बांधव उपस्थित होते. खरीपात पाऊस दगा देऊन गेला; आता प्रशासनही दगा देणार का? हा प्रश्न हिमायतनगर तालुक्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments