हदगाव, शेख चांदपाशा| सध्याचे युग स्पर्धेचे आहे, स्पर्धेच्या युगात पारितोषिक मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. अश्या मेहनतीच्या कार्याची पोच पावती म्हणून पारितोषिक मिळते त्यातूनच उच्च पदस्थ अधिकारी तयार होतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने सहभागी होऊन पारितोषिक पटविण्यासाठी जिद्ध चिकाटी ठेवावी असे उदगार हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Mla. Baburao Kadam Kohlikar) यांनी काढले.


हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आदर्श शिक्षक स्व. नरहरी यादवराव सुकापुरे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सत्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, पारितोषिक मिळविण्यासाठी आजच्या काळात स्पर्धा करावी लागते आहे. त्या स्पर्धेतून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण होतात त्यासाठी विद्यार्थी जीवनातूनच पारितोषिकासाठी शैक्षणिक चढाओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळेपासूनच ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन त्याचे रूपांतर उच्च पदस्थ अधिकारी निर्माण होण्यापर्यंत जात असते. आदर्श शिक्षक स्व. नरहरी सुकापुरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी पारितोषिक विद्यार्थ्यांना खूप काही जीवनात बदल घडू शकते असेही यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले.

यावेळी प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा मान ज्या विद्यार्थ्यांना मिळतो. त्यांना पारितोषि देण्यात येऊन त्यांना सन्मानचिन्ह देण्यात गौरव केला जातो. यंदा हादगाव विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते त्या सर्व युवकांचा सन्मान करण्यात आला. डोंगरगाव येथील योगेश मोरे याची यवतमाळ पोलीस दलात निवड झाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना आमदार महोदय म्हणाले कि, स्व नरहरी सुकापुरे हे शिक्षक माझ्या जन्म गावी दोन वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत होते. त्यांचा स्वभाव खूप शांत व संयमी शिक्षक होता. त्यांच्या उपचारासाठी मी स्वतः खूप प्रयत्न केले पण जे ईश्वराच्या मनात आहे तेच होत असते. त्यांच्या नावाने देण्यात येणारे हे पारितोषिक मी माझ्या हाताने देत आहे. यात माझं भाग्य समजतो असे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी म्हंटले.

दिनांक 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला डोंगरगाव वाशीयांनी भरभरून सहभाग नोंदवला.या कार्यक्रमात डोंगरगाव वाशियाच्या वतीने डॉ. बी. के. निळे यांनी प्रस्ताविक भाषणात आमच्या ग्रामीण भागातील शाळेला संगणक संच द्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान इथेच मिळेल व त्यासाठी संगणक रूम द्या अशी विनंती आमदार यांना केली. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, अनिल पाटील बाभळीकर, संभाराव लांडगे, गोपाल सारडा, माजी सभापती बालासाहेब कदम, आबा वानखेडे, संजय बोंढारे, बाबुसराव कदम, राजू तावडे, सुदर्शन जाधव, बबन कदम, शितल भांगे, संदेश पाटील, सरपंच दिगंबर निळे, ग्रा स भीमराव मुलगीर, ग्रामसेवक सावतकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय तिव्हाळे, मुख्याध्यापक तावडे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले हदगाव तालुक्यातील पत्रकार सुनील व्यवहारे, पंडित पतंगे, शेख.चांदपाशा, अरविंद पाटील, गौतम वाठोरे, वैजनाथ गुडूप, राहुल बहादुरे, शेख जुनेद, विकास राठोड, संदीप वानखेडे, गजानन सुकापुरे, आणि गावकरी नागरिक, पालक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे आयनीले सर यांनी केले.
