नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने विविध व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीपूजन निमित्ताने दुकानाचा बाहेर केळीच्ये खांबे, फुले,ऊस अन्य साहित्य लावून केलेली सजावट व नंतर काढून टाकलेले साहित्य ,फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे झालेला रस्त्यावर केरकचरा रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत विशेष अभियान अंतर्गत केलेल्या साफसफाई मुळे व मनपा अंतर्गत सहाही झोन मध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जवळपास दोनशे सतरा टन कचरा संकलन करून स्वच्छ नांदेड शहर केले.
दिवाळी निमित्ताने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पुजन निमित्ताने शहरातील वमनपाचा सहा झोन अंतर्गत आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक ,विभाग प्रमुख वसीम तडवी यांच्या आदेशानुसार विस स्वच्छता निरीक्षक, आर.बी.आय कंपनी सुपरवायझर यांच्या समवेत रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत आर.सी. कॉमप्रेसर 23 वाहनाव्दारे,13टेम्पो,3 ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने10 घंटागाडी यांच्या सहाय्याने सफाई कामगार पुरुष यांनी जवळपास 217 टन कचरा संकलन केला , यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वच्छ शहर व सुंदर शहर सकाळी दिसून आले. मनपाच्या स्वच्छता विभागाने राबविलेल्या या विशेष अभियानाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.