उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील कलंबर (खु.) शिवारात दि.१६ सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलिसांनी फौजी धाब्याच्या पाठी मागच्या बाजूस एका शेतात लिंबाच्या झाडाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ८ जुगारींना पकडले. कलंबर खु. शिवारात काही इसम गोलाकार बसून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसून आले.
ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना पाहुन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यातील ७ जणांना पकडण्यात आले. त्यात साईनाथ काळम (२४ रा. उस्माननगर ता.कधार), अनिकेत कांबळे (२६ रा. उस्माननगर ता कंधार.), उमाकात घुले (३१ रा. कलंबर खु.ता.लोहा), बालाजी घोरबांड (२९ रा.उस्माननगर ता. कंधार, प्रकाश चव्हाण (२८ रा. अर्धापुर ता. अर्धापुर.), नितीन एडके (२५ रा. राहुल नगर, वाघाळा नांदेड.), रामेश्वर घोरबांड (३१रा. उस्माननगर ता. कंधार) यांचा समावेश आहे.
त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या जवळून – खालील मुद्देमाल जप्त केला. साईनाथ काळमकडून – ३० हजारांचा मोबाईल व ४ हजार रुपये रोख, जुगाराचे साहित्य. अनिकेत कांबळेकडून बुलेट क्रमांक एमएच २६ सीजे ५७८९, मोबाईल ८ हजार रुपयांचा, रोकड असा एकूण १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. उमाकांतकडून दुचाकी क्रमांक एमएच २६ सीएम ३६९०, मोबाईल २५०० रुपयांचा, उर्वरित रोकड असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बालाजी घोरबांड याच्याकडून मोबाईल व रोकड असा ८१६० रुपये जप्त करण्यात आले.
प्रकाश चव्हाण याच्याकडून १० हजारांचा मोबाईल व ३८६० रुपये जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. नितीन एडके याच्याकडून ४ हजारांचा मोबाईल, रोकड व बदकछाप पत्ते असा एकूण ७६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामेश्वर घोरबांड याच्याकडून २९९० रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. यश पवार याच्याकडून रोकड व मोबाईल, जुगाराचे साहित्य मिळून ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असा एकुण ३ लाख ४३ हजार ५४० रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील सुर्यवशी, पोहेकाँ रेजिवाड, वरपडे, पोहेकॉ टेकाळे यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.