नवीन नांदेड| नांदेड मनपा हद्दीत वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान-2024 महावृक्ष लागवड सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १२० मोठया वृक्षाची लागवड कार्यक्रम प्रसंगी केले. हरित नांदेड अभियान अंतर्गत महावृक्ष १२० वृक्षाची लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, कनिष्ठ अभियंता अरूण शिंदे,किरण सुर्यवंशी डॉ.नरेश रायेवार, यांच्या सह वृक्षमित्र,नागरीक महिला युवक उपस्थितीत होते. सुत्रसंचालन वृक्ष मित्र संतोष मुगटकर यांनी तर उपस्थित मान्यवराचे स्वागत सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कदम यांनी सिडको परिसरात होत असलेली वृक्षारोपण लागवड व संगोपन महत्त्वाचे असल्याचे सांगून वृक्ष मित्र मोहन पाटील घोगरे हे १२० वृक्षाचे संगोपन करणार असल्याचे सांगितले. प्रारंभी वसुंधरा शपथ घेण्यात आली,यावेळी शशीकला रनबावळे, निवृत्ती रनबावळे, ज्ञानेश्वर निरनिराळे,जेष्ठ नागरिक एम.जी.गाढे, विश्वनाथ शिंदे, सौ.मोतेवार, देविदास कदम, यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थित होते.
मान्यवराचा हस्ते हनुमान मंदिर लातुर फाटा सिडको रोड येथे पाच वृक्ष लागवड करण्यात आली. मनपा हद्दीत शहरातील वाढत्या तापमानास नियंत्रित करण्या साठी,नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्या साठी२५ हजार वृक्षांची लागवड व संगोपन अभियान रक्षक ट्री-गार्ड सह १२० मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.सोहळा यशस्वी होण्यासाठी ,वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे, वृक्षमित्र प्रकाश झडते यांच्या सह कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,सवचछता निरीक्षक किशन वाघमारे, अरजृन बागडी,कर निरीक्षक संजय नागापूरकर व वसुली लिपीक यांनी परिश्रम घेतले आहे.