किनवट, परमेश्वर पेशवे| जिल्हयात मालाविरुध्दचया गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस स्टेशन किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 15 लक्ष 60 हजार 500 रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पो.स्टे. किनवट गुरनं 235/2024 कलम 303(2),306 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या ATM मशीन मधील 500 रुपये दराच्या 3479 नोटा ज्याची एकूण रक्कम 17,39,500 रुपये अज्ञात चोरट्याने त्यातील कॅसेटसह मशीन मधून चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल होता.


मा. पोलीस अधीक्षक श्री अबिनाशा कुमार यांनी सदर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पो.नि., स्थागुशा यांनी सपोनि संतोष शेकडे यांचे अधिपत्याखाली एक पथक किनवटला रवाना केले होते. सदर पथकाने किनवटला जावून पो.स्टे. किनवट येथील तपासीक अधिकारी पोउपनि सागर झाडे व त्यांचे पोलीस अंमलदार यांना सोबत घेवून भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता बँकेतील शिपाई गितेश नारायण भिमनेन्नीवार याच्यावर संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे बँकेतील सहकारी अकाउंटंट भारत सोनटक्के व क्लार्क रितेश विराळे याचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सदर आरोपीतांकडून गुन्हयात चोरी गेलेले नगदी रुपये 11,00,000 व आरोपी नामे गितेश भिमनेन्नीवर याचेकडून चोरीच्या पैशातून खरेदी केलेले 4,60,500/- रुपयाचे सोन्याचे दागिणे असा एकूण 15,60,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी 1) भारत देविदास सोनटक्के, वय 58 वर्ष, भा.म.सह. बँक कॅशिअर, रा.एस.व्ही.एम. कॉलनी किनवट 2) रितेश संग्राम विराळे, वय 30 वर्ष, भा.म.सह. बँक क्लार्क, रा. गोकुंदा, किनवट 3) गितेश नारायण भिमनेन्नीवार, वय 33 वर्ष, भा.म. सह. बँक शिपाई, रा. बेल्लोरी, किनवट यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री सुनिल बिर्ला, पो.स्टे. किनवट, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि संतोष शेकडे, पोउपनि सागर झाडे, पोउपनि दिनेश येवले, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, गजानन डुकरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, अनिल बिरादार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.