किनवट, परमेश्वर पेशवे। सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाईपोटी अनुदान वर्ग केले. परंतू तलाठी स्तरावर लापरवाही झाल्याने डीबीटी प्रणालीद्वारे आजही शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तलाठी ग्रामपंचायत अधिकार्यांकडे बोट दाखवतात, तर ग्रामपंचायत अधिकारी तलाठ्यांच्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करतात. यांच्यातील सारीपाठामुळे आता ई-केवायसी आणि त्यांनी केलेल्या चुकांच्या दुरुस्ती करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बाधित शेतकर्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आलीत. अगदी अल्प शेतकर्यांची व्हीके नंबर प्राप्त झाली असून उर्वरीत बहूतांश शेतकरी आजही अनुदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. शेतकऱ्यांनी माहीती अपलोड करुन व्हीके नंबर प्राप्त करुन घेण्यासाठी माहूरच्या तहसिलदारांनी शेतकर्यांना आवाहन केले मात्र किनवटच्या तहसिलदारांनी अद्यापतरी मनोगत व्यक्त केलेले दिसत नाही.
शेतकर्यांनी तलाठ्यांकडे आवश्यक कागदपत्रे दिली होती. परंतू संबंधितांनी अनुदान लाभार्थी यादीत चुकीचे आधार नंबर लिहिल्याने शेतकरी व्हीकेस पात्र ठरत नाहीत. आता कर्मचार्यांनी केलेल्या चुका शेतकर्यांनी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहाण्याची भीती व्यक्त होत आहे.