नांदेड| नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेमुळे पलॉटफॉर्म क्रमांक 1 वरील धाव पट्टी वरून निघालेल्या धावत्या जलदगती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नांत असताना सदरील प्रवाशाचा तोल ढासळला व प्लॉट फॉर्म व रेल्वेच्या मधील फटीत अडकलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्यात कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांनी यश मिळवले आहे.
प्लॉटफॉर्म क्रमांक 1 वर 17611 दिनांक 04.09.2024 रेल्वे सुरक्षा बल नांदेड ठाण्याचे निरीक्षक विनोदकुमार मीना यांच्या आदेशानुसार अधिपत्याखालील नांदेड रेल्वे ठाण्याचे एम.माधवराव उपनिरीक्षक PSI/RPF/NED व व्ही.डी.कांबळे कॉन्स्टेबल – 089 रेल्वे स्थानकावर प्लोटफॉर्म क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत होते. दरम्यान जलदगती रेल्वे क्रमांक 17611 ही पलोटफोर्म क्रमांक 1 वरून जात असताना नांदेड जिल्हयातील रामराव नागोराव सोनकांबळे वय वर्ष 47 रा. जरिकोट तालुका धर्माबाद येथील रहिवाशी असलेले प्रवासी जलदगती धावत्या रेल्वेस पकडण्याचा प्रयत्न करत असताना तोल ढासळून प्लोटफॉर्म व रेल्वे यातील फटीत अडकताक्षणी उपरोक्त कर्तव्यावर असलेल्या रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी समयसूचकता दाखवत स्वतःचा प्राण धोक्यात टाकून फिल्मी स्टाईलने प्रवाश्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले असुन कोणतीही विपरीत दुर्घटना घडली नाही.
सदरील घटनेतील अतीशय थरारक दृश्य उपस्थित प्रवाशांनी नयन दृष्टीपटलावर कैद करत असतानाच रेल्वे सुरक्षा बल जवानांनी तत्पर समसुचकता दाखवली असल्यामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी कर्मचारींच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये व आपला अमूल्य जीव नाहक गमावू नये असा महत्त्वपूर्ण संदेश रेल्वे सुरक्षा बल नांदेड तर्फ समयप्रसंगी देण्यात आले आहे.