नांदेड l व्यक्ती , समाज, संस्था, उद्योग, प्रशासन यांना सर्वोत्तमाचा ध्यास नसेल तर कोणत्याही राष्ट्राची प्रगती होत नाही. त्यामुळे जनतेने सर्वोत्तमाचा ध्यास ठेवून उन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण केल्यास स्वतः सह राष्ट्राचाही विकास होतो, भाग्यलक्ष्मी बँकेची वाटचालही तशीच चालू आहे. असे मत प्रतिद्ध आंतरराष्ट्रीय विचारवंत, सामाजिक राजकीय विश्लेषक, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. भाग्यलक्ष्मी बँकच्या २२ व्या व्याख्यानमालेत ते दुसरे पुष्प गुंफत होते .
खचाखच भरलेल्या कुसुम सभागृहात भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या २२व्या व्याख्यानमालेची रविवारी सांगता झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांची उपस्थिती होती. बँकेच्या अध्यक्षा सौ. सीमा अतनुरकर , उपाध्यक्षा सौ. रेखा मोरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा पराडकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक बँकेच्या अध्यक्षा सौ. सीमा अतनूरकर यांनी केली. सूत्रसंचालन अश्विनी चौधरी यांनी केले. तर आभार सुरेखाताई किनगावकर यांनी मानले. प्रारंभी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मंदाताई जोशी यांच्या प्रतिमेची आणि भारतमातेच्या प्रतिमेची पुष्मपूजा करण्यात आली तर दीप प्रत्वालनाने व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.
अनेक राष्ट्रांतील उन्नतीची असंख्य उदाहरणे सभागृहासमोर ठेवत डॉ. उदय निरगुडकर यांनी भारतीय परंपरेतील आणि तत्कालीन परिस्थितीतील सर्वोत्तमाबद्दल सखोल विवेचन केले. नागासाकी आणि हिरोशिमा या अद्योगिक वसाहती दुसत्या महायुद्धात बेचिराख झाल्याने जर्मनी सर्वच दृष्टीने कोलमडली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंड पराभवाच्या छायेत होता. माघार घेण्याचेही त्यांनी ठरविले होते परंतु ब्रिटनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चर्चिल यांच्या सर्वोत्तम ध्यासातील एका भाषणाने ब्रिटिश जनतेत क्रांतीचे स्फुल्लिंग चैतविले. परिणामी दुसऱ्या महायुद्धाचे परिणामच बदलले, जर्मनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही तेथील जनतेने घेतलेला सर्वोत्तमाचा ध्यास जर्मनीच्या पुन : उभारणीसाठी महत्वपूर्ण राहिला आहे. समाज जागरूक राहिल्याशिवाय राष्ट्र जागरूक होऊ शकत नाही.
केवळ एका व्यक्तीने विश्वगुरु होण्याची संकल्पना मांडून चालणार नाही, तर त्यासाठी देशातील प्रत्येकाने विश्वगुरू होण्याचा ध्यास उराशी बाळगून काम करण्याची गरज आहे. शिक्षण, व्यापार, उद्योजक, बँका, कामगार, संस्था आणि शासन हे जेव्हा सांघीकरित्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वोत्तम ध्यास घेऊन काम करतील, त्याचवेळी राष्ट्राच्या नव्या विकासाचा मार्ग आपोआप मोकळा होता, असेही ते म्हणाले. प्रत्येक घरातून, समाजातून कार्यक्षेत्र स्थापून ते संस्थेपर्यंत, इंडस्ट्रीपासून ते देशापर्यंत हा ध्यास घेऊन आणि शिस्तीचे पालन करून नियोजन केल्यास घेत्या २५ वर्षांत भारत जागतिक महासत्ता होईल. ज्या देशाकडे १९६३ मध्ये क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी संशोधकांकडे साधे वाहन नव्हते, तो देश आज मंगळावर, चंद्रावर आपले यान सोडतो आहे. यासाठी त्या संशोधकांच्या ठायी असलेला ‘सर्वोत्तम ध्यास’ कारणीभूत आहे.
कोरोना काळात अनेक महत्त्वाचे शोध लागले. राहुल रस्तोगी, मिर शहा, प्रशांत गाडे अशा अनेक नवतरुणांनी सर्वोतमाचा ध्यास घेऊन घेतलेल्या परिश्रमांमुळे राष्ट्राच्या विकामाला नवे आयाम मिळाल्याचे ते मिळाले. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात महिलांनी संशोधनात सर्वाधिक योगदान दिले. असे असतांनाही काही विरोधकांकडून सर्वोत्तम ध्यासाला तडे देण्याचे काम कोरोना काळातही झाले. अशा लोकांच्या विचारसरणीला बाजूला सारून राष्ट्राच्या उन्नतीसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सर्वोतम ध्यास घेऊन काम केल्यास येत्या २५ वर्षात जागतिक अर्थशास्त्राचा अभ्यास करतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल इतका विकास भारताचा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘भाग्यलक्ष्मी’ने समाज सुधारणेचा घेतलेला ध्यास सर्वोत्तम: प्राचार्य डॉ. गंगाखेडकर बँकींग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत गेल्या ४१ वर्षात असंख्य पुरस्कारांची लयलूट करणाऱ्या भाग्यलक्ष्मी बैंकने सहकार क्षेत्रातील सुधारणेसह व्याख्यानमालेच्या रूपाने सामाजिक सुधारणेचा घेतलेला ध्यास सर्वोत्तम असल्याचे प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. भारत जागतिक महासत्ता होण्याच्या अनुषंगाने समाजाने काम करण्यानी गरज आहे, कारण सर्वोतम ध्यासामधूनच मानवी उत्क्रांती झाल्याचे ते म्हणाले.
निबंध स्पर्धेत मोहिनी शेवडीकर यांना प्रथम पुरस्कार
भाग्यलक्ष्मी बँकेतर्फे घेण्यात आलेल्या ‘माझी बैंक, माझे योगदान’ या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार बँकेच्या वरिष्ठ अधिकारी (एचओडी प्रशासन) सी, मोहिनी राम शेवडीकर यांना प्रख्यात व्याख्याते आणि अर्थतज्ज्ञ डॉ उदय निरगुडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ५ हजार रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत कर्ज विभाग प्रमुख मुख्य कार्यालय नांदेडचे रवी बाहेती व नवीन मोंढ्यातील शाखेच्या शाखाधिकारी शुभांगी देशपांडे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेसाठी सुभाष कॉलेजचे प्रा. राजेश उंबरकर यांनी परोक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.