नांदेड। शीख धर्माचे पाचवे गुरु, महान शहीद श्री गुरु अर्जुन देवजी यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने सोमवार दि. 10 जून रोजी गुरुद्वारा तखत सचखंड येथे साजरा करण्यात आला. गुरु अर्जुनदेवजी हे पवित्र पावन श्री गुरूग्रंथ साहबाचे निर्माते आहेत.
श्री गुरु अर्जुन देवजी महाराज यांच्या शहीदी गुरुपूरब निमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शरबताचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुद्वारा तखत सचखंड येथे श्री सुखमनी साहिबचे पाठ व कथा करण्यात आली. वरील कार्यक्रमाचे आयोजन येथील “गुरु का खालसा संस्थेच्या वतीने तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या सहयोगाने करण्यात आले होते. गुरुद्वारा येथे शहीदी गुरुपूरबला समर्पित दि. 6 जुन ते 10 जुन 2024 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 वेळेत सुखमनी साहेबचे पाठ व कीर्तन कार्यक्रम पार पडले. पठण व प्रार्थनेनंतर गुरूंचा लंगर वाटप करण्यात आला. या वेळी पंजप्यारे सिंघसाहब भाई गुरमीत सिंघ पुजारी जी, कथाकार ज्ञानी सरबजीत सिंघ निर्मले आणि ज्ञानी भाई तनवीर सिंघ शाहू यांनी श्री गुरु अरजन देव जी यांच्या हौतात्म्य विषयी आणि गुरु साहिबांच्या जीवनावर आधारित कथा केली.
कार्यक्रमात आवर्जूनपणे पंज प्यारे साहिबान, जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघ जी, सहायक जत्थेदार संत बाबा रामसिंघ जी, बोर्डाचे अधीक्षक राजदेवेंदरसिंघ कल्ला, सहायक सुपरीटेंडेंट शरणसिंघ सोढ़ी, गुरु का खालसा संस्थाचे अध्यक्ष कश्मीरसिंघ भट्टी, जसबीर सिंघ चढ्ढा, राजेंद्रसिंघसिद्धू, हरप्रीत सिंघ रामगढीया, हरभजन सिंघ भट्टी, प्रीतमसिंघ हरियाणावाले, महेंद्रसिंघ रामगढीया, बलजितसिंग खालसा, सतनामसिंघ मिर्धा आणि साधसंगत मोठ्या संख्येत उपस्थित होते.