नवीन नांदेड। येथील प्रियंदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती वाघमारे या विद्यार्थिनीने ज्युनियर कॅटेगिरी मध्ये लावणी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण राज्यातून दुसऱ्या नंबर वर आली आहे.
अखिल नटराजन अंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिलिंग अँड फेस्टिवल ,सीआयडी पॅरिस फ्रान्सच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ऑल इंडिया 14th कल्चरल इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन अँड फेस्टिवल या कॉम्पिटिशन मध्ये सिडको नांदेड येथील प्रियंदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती वाघमारे या विद्यार्थिनीने ज्युनियर कॅटेगिरी मध्ये लावणी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण राज्यातून दुसऱ्या नंबर वर आली आहे.
तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी तिचे गुरु आशिष व तिच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.