नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय अशोकनगर नांदेडच्या सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव यांच्यी तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तपदी गौतम कवडे यांच्यी नियुक्ती मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे केली असून या नियुक्ती बदल क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी 2 डिसेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव यांच्यी नियुक्ती केली आहे तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त संजय जाधव यांच्या कडे असलेला पदभार गौतम कवडे यांना देण्यात आला असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव व गौतम कवडे यांच्या नियुक्ती बद्दल कार्यालयीन कर्मचारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.