किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातून मानव विकास अभियाना अंतर्गत कुपोषण मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल यांनी पाऊले उचलली असून प्रथमता अविकसित व दुर्गम भाग असलेल्या तालुक्यातील रुग्णांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत .
त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे मानव विकास योजने अंतर्गत कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये सर्व गरोदर माता व स्तनंदा मातांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के. पी. गायकवाड यांनी गरोदर मातांना पौष्टिक आहारात पालेभाज्याचा वापर करावा प्रोटीन्सचा आहारात समावेश असावा त्यामुळे बालकाची सुदृढ वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर गरोदर मातांना स्तनपान विषयी माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
नऊ महिन्याच्या कालावधीत गरोदर मातांना आपल्या आहारामध्ये कसल्या पद्धतीने बदल करायचे यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे दर महिन्याला मानव विकास कॅम्प घेण्यात येत असतात. तसेच त्या कॅप मध्ये गरोदर माताची बी पी लघवी शुगर एच. आय. व्ही. वि.डी.आर. एल.अशा अनेक तपासण्या आपण दर महिन्याच्या कॅम्पमध्ये तपासण्या करत असतो त्यामध्ये एखादा रुग्ण आपल्याला अशा सदृश्य आजारामध्ये आढळून येऊ शकतो.
त्यामुळे काही बाबीची खबरदारी सुद्धा घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे महिलांचे वजन व गरोदर मातांना तपासण्यासाठी डॉ. वानखेडे स्त्री रोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉ. कांबळे येत असतात गरोदर मातांची तपासणी करतात असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी गरोदर मातांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित डॉक्टर सातपुते डॉक्टर रत्नमाला जाणगेवाड , डॉक्टर बाशेट्टी डॉक्टर चव्हाण H. A. कोंडेवार H. A भालेराव M. P. W. जाधव M. P. W. चव्हाण तोंडेवाड व सर्व ANM व GNM व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.