नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पोनि श्री चंद्रशेखर कदम, पोस्टे अर्धापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मागील तिन दिवसांत पोळा सणाचे अनुषंगाने अवैध दारू विक्रेते व धाबा चालवणारे 07 इसमांवर कार्यवाही करून, छापा मारून 3.50.955/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोळा सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन अर्धापुर पोलीसांकडुन अवैध दारू विक्रेत्यांमध्ये महाराष्ट्र धाबा, मालेगाव, महाकाली धाबा अर्धापुर येथुन व अवैध दारू विक्रेत्यांकडुन एकुण देशी दारू व विदेशी दारू मिळुन 30.955/-रू चा प्रोव्हिबीशन गुन्हयाचा मुद्देमाल, एक फोर्ड कंपणीची कार किंमती 3,00,000/- रू. एक बजाज कपणीची मोटार सायकल किंमती 20,000/- रू असा मिळुन 3,50,955/- रू चा मुद्देमाल जप्त करून दिनांक 31.08. 2024 रोजी एक गुन्हा, दिनांक 01.09.2024 रोजी दोन गुन्हे, आणि दिनांक 02.09.2024 रोजी एक असे एकुण चार गुन्हे दाखल करून 07 इसमांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, डॅनियल बेन, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर कदम, पोहेकॉ विजय आडे, नरवाडे, पोना आणेबोईनवाड, पोकॉ डांगे, कदम, मपोकों इंदु गवळी यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.