नांदेड| पतंजली नांदेड तर्फे डी. एड. कॉलेज येथे नित्य योग वर्गाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने शहरातील बंदा घाट ठिकाणी 4 ते 8 डिसेंबर दरम्यान सकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत पाच दिवशीय निशुल्क योग शिबिराने करण्यात आली आहे.
पतंजली योग परिवार नांदेड तर्फे डी. एड. कॉलेज श्रीनगर ठिकाणी नियमित योग वर्गाची सुरुवात नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आली. हे वर्ग आदरणीय पंढरीनाथ कंठेवाड, हनुमंत ढगे, किशनराव केंद्रे, जनार्दन आठवले आदी मान्यवरांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली.
रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी नियमित नि:शुल्क योग वर्गाचे वर्धापन दिवस साजरी करण्यात आले. याप्रसंगी पतंजली योग परिवारातील सर्व योग सादक उपस्थित होते. पतंजली योग परिवार मे 2025 पर्यंत नांदेड जिल्हाभर 101 योग शिबिराचे आयोजन करणार आहे. त्याची सुरुवात बंदा घाट ठिकाणी 4 ते 8 डिसेंबर दरम्यान सकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत पाच दिवशीय निशुल्क योग शिबिराने होत आहे.
या शिबिरासाठी राज्य प्रभारी आ. दिनेशजी राठोड, राज्य कार्यकारणी सदस्य आ. सत्यनारायणजी अनमदवार, जिल्हा प्रभारी आ. राजेंद्रजी निकुंभ मार्गदर्शनासाठी लाभणार आहेत. तरी नांदेड शहरातील सर्व योग प्रेमींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे पतंजली योग परिवार नांदेड तर्फे सांगण्यात येत आहे.