नांदेड l नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त डॉ रविंद्रकुमार सिंगल यांच्या वाढदिवसा निमित्त पोलीस अंमलदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन गणपती मंदिर पोलीस मुख्यालयाच्या आवारात करण्यात आले होते.
या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. नांदेड पोलीस मित्र परिवार आणि श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले तसेच लकी ड्रॉ पद्धतीने यावर्षी रक्तदात्याला एकूण 11 सायकली भेट देण्यात आली
डॉ रविंद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी पोलीस अंमलदरांकडून हा उपक्रम राबवला जातो. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रवीण आम्लकंठवार, दत्ता गायकवाड, प्रकाश मामुलवार, अनिल मुपडे,आनंद भाडेकर, प्रदीप ऐमेकर यांच्या सह 2007 बॅचच्या सर्व पुरुष आणि महिला अंमलदारांनी परिश्रम घेतले आणि वाढदिवसानिमित्त चे विविध उपक्रम यशस्वी केले आहेत