अर्धापूर| तालुक्यातील पार्डी मक्ता येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालिका पंचायतीची निवड करण्यात आली. सरपंचपदी भक्ती मदने, उपसरपंचपदी वैशाली मदने तर सदस्यपदी पुर्वी ठोंबरे, वैशाली बंडगर, वैष्णवी शिखरे, अपुर्वा कांबळे, राजश्री मरकुंदे, साक्षी लोखंडे, स्वाती कांबळे, पायल बोराटे, प्रतिक्षा खुणे आदींची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच शोभा कांबळे, उपसरपंच नीळकंठ मदने, ग्रामविकास अधिकारी शिवकुमार देशमुख, पर्यवेक्षिका सुनंदा कांबळे, प्राथमिक शिक्षिका उषा नळगीरे, मंगला सलामे, पवना खिल्लारे, गोदावरी नरवाडे, सीमा मरकुंदे, भावना गिरी, शीतल पांचाळ, पुनम पांचाळ, लक्ष्मीबाई मुराळकर, सुनीता बेतीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका मंदा नरोटे, रोमा मदने, स्वाती कांबळे, सरस्वती खंडागळे, सया हुपाडे, लता दाढेल, आशा वर्कर गुनाबाई कांबळे आदींनी परिश्रम घेतले.