नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक13 जागेसाठी साठी सर्व मान्य आदर्श विकास पॅनल उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 8 एप्रिल रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सभासदांशी प्रत्यक्ष भेट घेऊन पॅनलने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली असून यावेळी अनेक सभासदांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.


नावा मनपाच्या कर्मचारी पतसंस्थेची निवडणुक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 दरम्यान मनपा शाळा क्रमांक 1 वजिराबाद नांदेड येथे होणार असुन मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार आहे.नावा मनपा कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 घोषीत झाल्या नंतर 13 जागेसाठी 27 ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


सर्वमान्य आदर्श विकास पॅनल माजी अध्यक्ष कै.तानाजी कानोटे, माजी अध्यक्ष दयानंद गायकवाड, पुरस्कृत पॅनल व पॅनल प्रमुख गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण गटातील ऊमेदवार कानोटे शाम गंगाराम, कोल्हापूरे सतपाल सिंघ रणजितसिंघ ,जमील अहेमद म.वजिर,जाधव रणजित नारायण,जौधंळे साहेबराव विठ्ठलराव बनसोडे सुमेध भगवान,स.जाकेर अली मेहमूद अली सयद, सोनकांबळे विशाल बालाजी, अनुसूचित जाती जमाती राखीव वंदने दिलीप वामनराव,महिला राखीव घुले आशाबाई सुग्रिव,पतेवार निर्मला पोतन्ना,भटक्या विमुक्त जाती जमाती नागरगोजे गणेश वामनराव, ईतर मागासवर्गीय राखीव स्वामी ओंकार दिगंबर हे ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत निशाणी कपबशी यावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास साठ सभासद असुन 8 एप्रिल रोजी सर्वमान्य आदर्श विकास पॅनलच्या उमेदवार यांनी भेट घेऊन सुसंवाद साधला असून सभासद मतदार यांनी प्रतिसाद दिला आहे.
