श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात सर्वत्र श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा भाविकांच्या भाउगर्दीत राजकीय नेते मंडळी जास्त सक्रीय दिसुन आली. आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवुन श्री गणेशाच्या सार्वजनीक उत्सवाचे विविध राजकीय पक्षाच्या ईच्छुकांनी भांडवल केल्याचे दिसुन आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश उत्सव माहूर शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शांतताप्रिय माहूरगड शहर व तालुक्यात उत्सवा दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. विसर्जन मिरवणुकीमध्ये सुध्दा कुठेही गालगोट लागले नाही.पोलीस प्रशासनाने सुध्दा मिरवणुक तथा विसर्जन करण्याच्या ठिकाणी खास बंदोबस्त ठेवला होता.
यंदा श्री गणेशाची स्थापना झाल्यापासुनच विविध सार्वजनीक मंडळांना राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी भेटी देणे सुरु केले होते. यंदा सार्वजनीक गणेश मंडळास देणग्याही कमी पडल्या नाही. आगामी विधानसभा निवडणुक लढवु ईच्छीणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या ईच्छुकांनी स्वतः गणेश मंडपात जावुन देणग्या दिल्याचे दिसुन आले. कुठे नगदी तर कुठे ढोल-ताशांकरीता व अन्नदानाकरीता सढळ हाताने यावेळी राजकीय लोकांनी मदत केल्याचे दिसुन आले. गणेश मंडळास भेटी देतांना ईच्छुकांनी मोठ्या प्रमाणात फोटो सेशन केले. काहींनी श्री गणेशाची आरती केली, काहींनी अन्नदानाच्या वेळी वाढण केले. तर काहींनी प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत ठेके धरले होते. त्यांच्या या सर्व कृतीचे फोटो सेशन व व्हीडीओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हॉयरल केले.ऐरवी सनासुधीला भ्रमणध्वनी बंद करुण किंव्हा परप्रांतात जावून जनतेपासून दुर राहणार्या पुढार्यांनी माञ यावर्षी स्वतः हून श्री गणेश उत्साहात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने गणेश मंडळासह जनतेने आश्चर्य व्यक्त केले.
यावर्षी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस राजकीय रंग आले होते. विधानसभा निवडणुक डोळ्या समोर ठेवुन हजारो भाविकांना आकर्शित करण्याकरीता कधी नव्हे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षातील ईच्छुकांनी ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरला होता. यावर्षी प्रथमच राजकीय मंडळीचा जथ्था विसर्जन मिरवणुकीत दिसुन आला. मिरवणुकीत सहभागी हजारो भक्तांना आपला चेहरा दाखविण्याकरीता ईच्छुकांनी कार्यकर्त्यांच्या खाद्यांवर बसुन ढोल-ताशांवर नाचण्याचा आनंद लुटला. ईच्छुकांच्या खांद्यावर बसुन नाचण्याच्या नादात मात्र कार्यकर्त्यांचे खांदे झुकल्याचे पहावयास मिळाले. एकंदरीत गणेश उत्सवाचे राजकीयांनी केलेले भांडवल शहरासह माहूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी नवरात्रौत्सवामध्ये सुध्दा अशाच प्रमाणे राजकीय मंडळी सरसावल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. कारण निवडणुका केव्हाही लागु शकतात.