बिलोली, गोविंद मुंडकर। वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात झाली. कारला बुद्रुक येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी वर्षा ठाकूर यासह शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील समाज दिग्गज येथे मार्गदर्शन केले होते.
केवळ वृक्ष लावून उपयोगाचे नाही तर झाडांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे. हे बाब चांगल्या पद्धतीने रुजवण्यासाठी बिलोली तालुक्यातील शिक्षक सेनेने प्रयत्न सुरू केले. उपक्रमशील असलेल्या श्री बालाजी गेंदेवाड यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले. कारला बुद्रुक येथे याविषयी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यासह शिक्षण विभागातील गणमान्य मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले होते.
जिल्हा शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा उपक्रम अखंड चालवण्याचा संकल्प घेतलेल्या वृक्ष प्रेमींनी यावर्षीही झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावर्षीच्या झाडाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दिनांक 14 जून 2024 रोजी पार पडला. सत्यभामा गेंदेवाड आणि बालाजी गेंदेवाड यांच्या उपक्रमाला कार्यप्रवण गटशिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी प्रोत्साहन दिले.