नांदेड l जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांकडून अवैद्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक संदर्भाने कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.


त्या अनुषंगाने काही इसम अवैधरित्या वाळु उपसा करीत आहेत अशी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाले वरून दिनांक 26फेब्रुवारी 25 रोजी सकाळी 08 वाजेपासून दुपारी 4 वा.चे दरम्यान पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व लिंबगाव हद्दीत विष्णुपुरी, थुगाव, कल्लाळ या भागात पोलीस व महसूल च्या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे सहा इंजिनसह एकुण 24,00,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन सदर कार्यवाहीच्या अनुषंगाने पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


जिल्हाधिकारी नांदेड, राहुल कर्डिले, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सुशिलकुमार नायक,उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा, नांदेड, पंढरी बोधनकर,सपोनि पोस्टे लिंबगाव, पोकों घुन्नर,पोहेकॉ टाक, चालक पोकों सोनकांबळे, पोस्टे लिंबगाव, नायब तहसिलदार स्वप्निल दिघलवाड, काशिनाथ डांगे,मंडळ निरीक्षक शकुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, तलाठी शसंजय खेडेकर, विजय रणविरकर, माधव भिसे, उमाकांत भांगे, संताजी देवापूरकर, गिरी, शमनोज सप्रे,बिद्राळे, मनोज जाधव यांनी कारवाई केली.


त्यांचे या कार्यवाहीचे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उत्कृष्ठ कामगिरी करीता अभिनंदन केले तसेच अवैद्य वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर भविष्यात अजुन कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.



