नांदेड। येथील अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाडसाने बोला आणि जग जिंका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सभा धीटपणा , सकारात्मक विचारनिर्मिती, आत्मविश्वास विकसन व सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास यासह व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणारी ही एक महत्वपूर्ण कार्यशाळा असेल अशी माहीती आयोजक तथा अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रा.प्रकाश पाटील गिरे यांनी यावेळी दिली.
या विषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , आयुष्याला नवा विचार, नवी दिशा देणारा रविवार हा दिवस ठरेल कारण ही कार्यशाळा ही आठवड्यातुन एक दिवस म्हणजे रविवारी आयोजित करण्यात येते आणि यात एकूण आठ आठवड्याची ही कार्यशाळा असते तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना हजारो लोकांसमोर धाडसाने भाषण करण्याचा आत्मविश्वास देणारे एकमेव वक्तृत्त्व प्रशिक्षण केंद्र म्हणून अष्टपैलू वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र हे मागील १५ वर्षापासून कार्यरत आहे.
कार्यशाळेत काय शिकाल?
■ हजारो लोकांसमोर आपले विचार प्रभाविपणे, धाडसाने मांडण्याची भाषणकला. ■ सुत्रसंचालन, निवेदन, कथाकथन ■ सभा जिंकण्याचा आत्मविश्वास ■ नेतृत्त्वाचे रहस्य, कार्यकर्ता ते नेता बनण्याचा रोडमॅप, प्रचार-प्रसार यंत्रणा ■ निवडणुकीला समोरे जाताना, जाहिरनामाची संकल्पना ■ प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी विचार
येथे करा संपर्क – शेकडोंनी घेतला लाभ आपणच का मागे…?तरुण, तरुणी, महिला, पुरुष सर्वांसाठी प्रवेश व मागील १५ वर्षांपासून असंख्य वक्ते व नेते घडविणारे, प्रशिक्षक : प्रकाश गिरे पाटील सर, वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र, पत्ता : राज मॉल समोर, आनंदनगर, नांदेड मो. 7038501500, 9766540232