नांदेड| परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने नांदेड शहरात 9 ठिकाणी बाजारपेठ प्रतिकात्मक बंद ठेवुन व 3 ठिकाणी पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. आयोजीत करण्यात आलेले मोर्चे, निदर्शने, निषेध आंदोलन आदींचा पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्त शांततेत पारपाडला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने जारी केली आहे.
दिनांक 10/12/2024 रोजी परभणी जिल्हयात येथेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केल्याचे निषेधार्थ दिनांक 12/12/2024, 13/12/2024 व दिनांक 14/12/2024 रोजी नांदेड शहर व जिल्हयात तालुका, गाव इ.ठिकाणी असे 15 ठिकाणी निषेध करून निवेदने देण्यात आली. 9 ठिकाणी बाजारपेठ प्रतिकात्मक बंद ठेवुन व 3 ठिकाणी पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. सदर मोर्चा संपल्यानंतर आयोजका तर्फे मा. जिल्हाधिकारी, मा. उपजिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांना संबंधीत विषयाबाबत निवेदने देण्यात आली.
सदर मोर्चा, आंदोलन बंदोबस्ता करीता पोलीस मुख्यालय येथील 20 स्ट्रायकिंग, 5 आरसीपी, 1 एसआरपीएफ ची कंपनी तसेच जिल्हयातील संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अंमलदार, जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, अंमलदार पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी, अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. जिल्हयात सदर मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडु न देता बंदोबस्त शांततेत पार पाडण्यात आला आहे.
सदर महत्वाचा व संवेदनशील बंदोबस्त हा अबिनाशकुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली शांततेत पार पाडण्यात यश आले आहे.