उस्माननगर। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन उस्माननगर येथून जवळच असलेल्या शांतीदूत बुद्ध विहार सिध्दार्थ नगर भोपाळवाडी , कलंबर बु. लोहा येथे दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी मंगलमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ : ३५ वा .पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रावसाहेब पाटील भोपाळे ( मा. सरपंच ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.पांचाळ मॅडम ( ग्रामसेविका ) , मा. नरेंद्र गायकवाड ( उपसभापती पं.स.लोहा ) , बाबुराव गोरे ( म. गां. तं. मु. अध्यक्ष कलंबर ) , महेश करंडे ( पो.पा. भोपाळवाडी ) , प्रमुख पाहुणे म्हणून शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आ. जिल्हाध्यक्ष नांदेड ) , बालाजी परदेशी ( मा. जि.प. सदस्य ) , डि.के. कांबळे ( सामाजिक कार्यकर्ते ) , संतोष पाटील गवारे. ( वं. ब. आ. ता.अध्यक्ष लोहा ) , दत्ता कांबळे ( पत्रकार तरूण भारत) , मारोती करंडे ( मा.सरपंच ) , विठ्ठल ताटे पाटील ( पत्रकार) ,
दिलीप पाटील भोपाळे ( ग्रा.पं. सदस्य कलंबर ) , विठ्ठल कांबळे ( ग्रा.पं. सदस्य) , मारोती पाटील घोरबांड ( संस्थाचालक ) , राहुलदादा राके. ( सामाजिक कार्यकर्त्या) , मारोती कोठेवाड , जिवन पाटील भोपाळे , श्री पाटील ताटे ( छावा तालुकाध्यक्ष लोहा ) , बाळु पाटील भोकरे , यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता गावातील प्रमुख रस्त्याने तथागत भगवान गौतम बुद्ध व बोध्दीसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक निघणार आहे. रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माधव वाढवे ( हादगाव ) व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कु. नालंदा सांगवीकर ( नांदेड ) यांच्या भीम गीताचा. दणदणीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . तरी परिसरातील भीमसैनिक समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन नामदेव कांबळे , देविदास वाघमारे , राहुल गायकवाड , गंगाधर हानवंते , यांनी केले आहे.