लोहा l महाराष्ट्र शासनाने “जीवंत सातबारा” मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये सात बारा (7/12) वर वारस नोंदणी अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.तेव्हा लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी केले आहे


राज्यातील शेतकऱ्यांसाठी जीवंत सातबारा (७/१२) मोहीम राज्य।सरकारने सुरू केली आहे त्याअनुषंगाने लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे असे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगितले .


गावोगावी १ ते ५ एप्रिल या काळात तलाठी चावडी वाचनाद्वारे मयतांची यादी तयार करतील..६ ते २० एप्रिल या कालावधीत मृत्यू प्रमाणपत्र वारसा प्रमाणपत्र ओळखपत्र अशी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे जमा करावीत २१ एप्रिल ते १० मे या काळात – तलाठी व मंडळ अधिकारी चौकशी करून वारसांची नोंदणी पूर्ण करतील त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र / शपथपत्र ओळखपत्रे (आधारकार्ड, रेशनकार्ड इत्यादी .) ग्रामपंचायत पोलीस पाटील यांचा दाखला सादर करणे आवश्यक आहे हिब
संपूर्ण प्रक्रिया मोफत असून, सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली वारस नोंदणी करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी ग्रामसेवक, तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आपला हक्क आपल्या नावावर! “जिवंत सातबारा” संधीचा लाभ घ्या असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे देऊळगाव यासह अनेक गावात जाऊन तलाठी “जीवंत सातबारा” मोहीम राबवित आहेत.
