देगलूर/नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने मारोती, पोलीस निरीक्षक देगलुर यांनी पथक तयार करून अवैध धंदयावर कार्यवाही करणे चालु होते.
दिनांक 27 रोजीचे 14.51 वाजता गोपनिय माहिती वरून, पो.स्टे. देगलुर हद्दीत मदीना कॉलनी, नरंगल रोड देगलुर येथे गौवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवले आहेत. त्यावरून पो.स्टे. देगलुर येथील पथकाने सदर घटनास्थळी जावुन गोवंश जातीचे जनावरे 11 बैल अंदाजे किंमत 3,37,000/- रूपयाचे जनावरे मिळुन आल्याने सदरचे गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवुन वरील आरोपीवर गु.र.नं.503/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2025 2) गु.र.नं.505/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०२५ प्रमाणे, माधव संभाजी मरगेवाड वय 42 वर्ष पोहेकॉ/647 पो.स्टे. देगलुर जि. नांदेड, राजवंतसिंघ सुरजितसिंग बुंगई वय 36 वर्ष पोकों/3141 पो.स्टे. देगलुर जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलुर पोलीसांनी उत्कृष्ठ कामगिरी केली याबाबदल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड (IPS), सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी, देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली मारोती मुंडे, पोलीस निरीक्षक देगलुर, नरहरी फड, पोलीस उपनिरीक्षक, गोपाळ इंद्राळे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदा माधव मरगेवाड, कृष्णा तलवारे, सुधाकर मरदोडे, राजवंतसिंग यांनी आरोपी मोहम्मद जियाओद्दीन गुलाम रब्बानी वय 54 वर्श मदीना कॉलनी, नरंगल रोड, देगलुर, जमील महेबुब कुरेषी वय 45 वर्श रा. खाजाबाबानगर, देगलुर यांच्यासह गोवंश जातीचे 11 (बैल) किं.अं. 3,37,000/- रूपयाचे जनावरांना ताब्यात घेतले.