किनवट, परमेश्वर पेशवे| कोसमेट फाट्यापासुन ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेपासुन अवघ्या काही अंतरावर खुलेआमपणे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असून या जुगार अड्ड्यावर संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कोसमेट ते कुपटी रोडवर एका फायनान्स कर्मचाऱ्याल्या दिवसाढवळ्या लुटल्याची घटना 11 जुलै रोजी घडली होती आणि इस्लापूर पोलिसात रॉबरीचा गुन्हा ही दाखल झाला होता ही घटना ताजी असताना देखील. कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेच्या काही अंतरावर राजरोसपणे दिवसाढवळ्या जुगार अट्टा चालवला जातो याचे भय कुणाला असा सवाल येथील नागरिकातून उपस्थित होत आहे.
कोसमेट फाट्यापासून ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालय व श्रद्धास्थान असलेलं मंदिर असून या रोडवर नेहमीच विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी बाहेर गावाहून देखील नागरिक येथे येत असतात आणि दिवसाकाठी या जुगार अड्ड्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते त्यामुळे या भागातील नागरिक व तरुण विवाहित मुले बरबाद होत असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळत आहे.
या जुगार अड्ड्यामुळे पैसे कमावण्याच्या नादात तरुण वर्ग कोण्या मार्गाला जाईल याचा आता नेम राहिलेला नाही आणि याच परिसरात अशा रॉबरीच्या घटना ताज्या घडत असताना देखील दिवसा ढवळ्या जुगार चालवला जात असताना संबंधित यंत्रणा मात्र मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने या यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या संबंधित यंत्रणेने या जुगार अड्ड्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून मोठ्या प्रमाणात होत आहे.