मुंबई,नांदेड,हिमायतनगर, अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाबुरावजी कदम कोहळीकर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या काळात खुद्ध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेतील हिमायतनगर येथे जाहीर सभा घेऊन तुम्ही बाबुरावला निवडून द्या तुमच्या विकासाचे स्वप्न साकार करू असा विश्वास दिला होता. तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून देऊन रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे देखील आश्वासन दिले. तसेच लाडक्या बहिणींना संबोधित करताना तुमचा आशीर्वाद बाबुरावसह महायुती सरकारला मिळाला तर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ केली जाईल. तसेच शेतकर्याच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. शेतकयांचे साढेसात एचपीचे वीज बिल माफ करणार आहोत. तसेच महायुती सरकारने चालू केलेल्या सर्व योजना यशस्वी पणे राबविण्यात येतील असेही आश्वासन दिले होते.
त्यामुळे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य दिले आहे. आता नवीन सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येणाऱ्या २८ तारखेला मंत्रिमंडळ स्थापन होऊन सर्व आमदार शपथ घेतील याची तयारी सुरु आहे. त्यासाठीच हादगावचे नवनिर्वाचित आमदार तथा लोकनेते बाबुराव कदम यांच्यासह सर्व शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार मुंबई एअरजेट विमानाने पोचले आहेत. मुंबई येथे पोचताच आमदार बाबुराव कदम आणि आमदार संतोष बांगर यांनी प्रथमतः चैत्यभूमी स्थळी जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित होऊन दर्शन घेत अभिवादन केले.
तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी बाबुरावजी कदम कोहळीकर सह सर्व नवनिर्वाचित आमदारांना मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभेतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिला. याप्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, राजेश फुलारे, संभाराव लांडगे मामा, विकास पाटील देवसरकर, राजू पाटील शेलोडेकर, रामभाऊ सूर्यवंशी, नाथा पाटील, विठ्ठल कदम, चंद्रशेखर पाटील, भागवत देवसरकर, एकनाथ पाटील, आबा वानखेडे, साईनाथ कोमावार, विकास नरवाडे, मोहम्मद जावीद हाजी अब्दुल गन्नी, गौरव सूर्यवंशी, अरुण मिटकरे, अतुल राऊतराव, अभिलाष जयस्वाल, सावन डाके, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.