नांदेड| सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा या मार्गावरील एकता रॅलीमध्ये व रेल्वे डिव्हिजन कार्यालय नांदेड येथे आयोजित एकता रॅलीमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना जनजागृतीचे स्टीकर्स, बॅनर्स, पॉम्पलेटस वाटप करून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार कशी करावी याबाबत ला.प्र.वि.चे संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.


राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम आज विविध ठिकाणी घेण्यात आला.


नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, राहुल तरकसे पोलीस निरीक्षक, करिम खान पठाण, श्रीमती प्रिती जाधव, श्रीमती अनिता दिनकर, श्रीमती अर्चना करपुडे व सर्व पोलीस अंमलदार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवस “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.


ला.प्र.वि.चे पोकॉ/1487, चापोहेकॉ / 1889 साईनाथ आचेवाड हे नांदेड जिल्हयातील माहुर तालुक्याचे तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, बसस्थानक तसेच सारखणी व सिंदखेड याठिकाणी जावून तेथे बोर्डवर व दर्शनी भागावर दक्षता जनजागृती सप्ताह 2025 चे फलक व स्टीकर लावून तेथे उपस्थित असलेले नागरिकांना जनजागृती संबधाने प्रचार साहित्य वाटप केली.


नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय इमारतीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे. सर्व नागरिकांनी शासकीय अधिकारी / कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पालवे : 02462-255811, मो. नंबर 9226484699. अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम : 02462-255811, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार : मो नंबर 9359056840. टोल फ्रि : 1064. ला.प्र.वि. नांदेड दुरध्वनी क्रमांक : 02462-253512.


