नांदेड| शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातून दोघांनी 12.800 ग्रॅम सोन्याचे शॉर्ट गंठन, व एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 1,20,800 /- रुपये चा मुद्देमाल चोरून नेला होता. या आरोपींचा शोध घेऊन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांने दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील जबरी चोरी संबधाने गुन्हे उघडकिस आनन्यासाठी सर्व पो.स्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जालींदर तांदळे पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे गुन्ह्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण वजन 12.800 ग्रॅम सध्याची किंमत 80800 रुपये 2) एक स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल किं.अं. 40,000 रुपये जु.वा असा एकुण 1,20,800 रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरी करनारे 1) अमन किशोर जोगदंड वय 21 वर्ष, रा. विष्णुनगर, नांदेड, 2) विधिसंघर्षीत बालक ईसम यांना रेल्वेस्टेशन प्लॅट फॉर्म क्रं 04 च्या अंतगर्त रस्त्यावरुन ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपसुन केली.
यावेळी त्याच्याकडे सदर गुन्हयातील मुददेमाल एक सोन्याचे शॉर्ट गंठन वजन 12.800 ग्रॅम सध्याची किंमत 80800 रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल किं.अं. 40,000 रुपये जु.वा त्यांचेकडे मिळुन आला. असा एकुण 1,20,800 रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांनी काढुन दिल्याने सदर मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर आरोपीतांकडे अधिक सखोल विचारपुस केले असता त्यांनी पो. स्टे भाग्यनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी तिन जबरी चोरी केल्याचे कबुल केले असुन पो.स्टे भाग्यनगर येथील गुरक्रं 546/24 कलम 304 (2) भा. न्या. स प्रमाणे व ईतर दोन गुन्हे असल्याने निष्पन्न झाले आहे.
सदर कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड मा. किरतीका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली जालींदर ए. तांदळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो. स्टे शिवाजीनगर किशोर गावंडे पोलीस उपनिरीक्षक पो. स्टे शिवाजीनगर, नांदेड पोलीस अंमलदार पोहेकॉ अनिल झांबरे, पोकों/ अझरोद्दीन शेख, लिंबाजी राठोड, देवसींग सिंगल, सरबजीतसींग पुसरी, मिथुन पवार, दत्ता वडजे सर्व नेमणुक गुन्हे शोध पथक पो.स्टे शिवाजीनगर, नांदेड व तसेच राजु सिटिकर सायबर सेल नांदेड यांनी केली. वरिष्ठांनी पो. स्टे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.