श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सवाचि आठवी माळ सप्तमी अष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता मातेच्या वेद घोषात वैदिक महापुजेस प्रारंभ करण्यात आला त्यानंतर मातेला अलंकारासह गुलाबी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण करून वेद पारायण फुलोरा सुरु करण्यात आला. सरस्वती पूजन झाल्यानंतर मातेला गाईच्या शुद्ध तुपाचा पायस नैवेद्य अर्पण करून ५१ कुमारीकासह ५१ सूवासीनीचे पूजन करण्यात आले आले, यावेळी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव सर्व विश्वस्थ तथा पुजारी यांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती शतचंडीपाठास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
श्री रेणुका मातेस दुपारी पायस नैवेद्य गाईचे तूप अर्पण करण्यात आले, आरती झाल्यानंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली,परिवार देवतांचे पूजन झाल्यानंतर भाविकासासाठी भगवान परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद महाअन्नदान सुरू करण्यात आले, यानंतर मातेस पायस महानैवेद्य गाईचे तूप अर्पण करण्यात करुण त्यानंतर महाआरती द्वारे दुपारचे धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले, यावेळी तरवडी जिल्हा अहमदनगर येथील सोमेश्वर भारुड मंडळाकडून समाजप्रबोधन भारुड गायन सादर करण्यात आले तर परभणी येथील कृष्णराज लवेकर यांनी विष्णुदासाची कविता सादर केली.
श्री रेणुका माता मंदिरात सप्तमी अष्टमी माळेच्या दिवशी श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड श्रीमती सुरेखा कोसमकर,सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली,उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ सुवासिनी आणि ५१ कुमारीकाचे पूजन करण्यात आले, यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, विनायकराव फांदाडे, आशिष जोशी, अरविंद देव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत यांचेसह पुजारी भवानीदास भोपी, राजू भोपी, जहागीरदार शुभम भोपी, ॲड. उज्वल भोपी, आनंद देव, निलेश केदार गुरुजी, मनोज बनसोडे यांचेसह सर्व मानकरी व्यवस्थापक योगेश साबळे स.व्य नितीन गेडाम, लिपिक अरविंद राठोड यांचेसह सर्व कर्मचारी भाविकांच्या उपस्थितीत कुमारिका पूजन आनंदात पार पडले.