किनवट, परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यामधील दोन मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकी दरम्यान केला आहे.
मागील काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या 88 जागेमध्ये किनवट माहूर मतदार संघाचे नाव नसल्याचे एका नामांकित वृत्तपत्रातून बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि प्रदीप नाईक हे माननीय शरद पवार यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईला गेले असे सोशल मीडिया मधून वल्गना करण्यात आली होती.
त्यामुळे अनेक विरोधकांच्या मनामध्ये जणू काही नवविवाहित नवरदेवाच्या मनामध्ये जसे काही लड्डू फुटावे तसे किनवट तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. “अब तो भाया गियो” असे म्हणत किनवट माहूर मतदार संघात आता आपलेच राज्य.. असे स्वप्न पाहणाऱ्याच्या तोंडचे आणि मी म्हणणाऱ्यांच्या मात्र तोंडाचे पाणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मी म्हणणाऱ्यांच्या तोंडाचे मात्र पाणीच पळविले. माजी आमदार प्रदीप नाईक हे इस्लापूर भागातील परोटी तांडा,व पांगरी या गावांना भेटी देण्यासाठी नुकतेच दौऱ्यावर आले असता त्यांनी इस्लापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चांगलाच किनवट माहूर मतदार संघा विषयी खुलासा केला.
किनवट माहूर मतदार संघामध्ये माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह मी घराघरात पोहोचविले आहे त्यामुळे किनवट तालुक्यामध्ये जिकडे जावे तिकडे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह दिसू लागल्याने माननीय शरद पवार साहेबांनी याची दखल घेऊन किनवट चा पॅटर्न हा सपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचे माननीय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील यांनी त्याप्रसंगी बोलून दाखवले.
माजी आमदार प्रदीप नाईक हे पत्रकारांशी संवाद साधताना मागील काही जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की माझ्या घरी कुणीही मला भेटायला आले असेल तर कदाचित मी जरी घरी नसलो तरी माझ्या घरी येणारा कुठलाही व्यक्ती किमान फराळ चहापाणी केल्याशिवाय परत जात नाही हे माझ्या आई वडिलांनी दिलेले मला संस्कार आहेत.. त्यामुळे किनवट माहूर मतदार संघातील जनसामान्यांशी माझी जोडलेली हीच नाळ आहे आणि जनसामान्याचेच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.
राहिला प्रश्न किनवट माहूर मतदार संघाच्या निवडणुकीचा येणाऱ्या निवडणुकीत तो आपल्याला जनसामान्यांच्या माध्यमातून आणि माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हा मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल असे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी याप्रसंगी बोलून दाखवले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय शरद पवार राष्ट्रवादी गटाचे दोन मतदारसंघ राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील, संचालक शेख जब्बार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा तालुका उपाध्यक्ष शेख अनवर, तालुका कार्याध्यक्ष गजानन सोळंके पाटील, माजी सभापती खंडू मोधे, सरपंच स्वप्निल राठोड,डी के जाधव, माजी सरपंच शिवाजी बोटेवाड, नंदू गायकवाड, दासू तोटावाड, मनोज राठोड,सावण जयस्वाल,शिवराम जाधव, डॉक्टर भगवान गंगासागर, सुरज जाधव, बंटी आडे, भुरके सर, गणेश मोतेवार, श्याम साखरे, साहेबू गुंजकर, संतोष जाधव, राजू जाधव, सुंदर मुंडावरे, संदिप जिनेवाड, आकरम भाई, लक्ष्मीबाई सुलभेवार, लक्ष्मीबाई पोहेकर, हिराबाई जाधव, पत्रकार परमेश्वर पेशवे, गणेश जयस्वाल, मारुती शेळके, गौतम कांबळे, प्रमोद जाधव, गजानन वानोळे, राजेश गायकवाड, रावसाहेब कदम, विलास भालेराव, इम्रान घोडके, गणेश यमजलवाड, यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.