किनवट,परमेश्वर पेशवे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाज बांधवांचे आमरण उपोषण धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन हे सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच नागेश पाटील अष्टीकर यांच्या पॅड लेटरचा गैरवापर करून कुठल्यातरी एका समाजाच्या आंदोलनाला किंवा आमरण उपोषणाला पाठिंबा दिल्याचा असा लेटर पॅडवर कांगावा केल्याचे समोर आल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना एका विशिष्ट समाज बांधवाकडून ट्रोल केले जात आहे त्यामुळे याबाबतीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही गोरगरिबांचे काम होण्यासाठी आणि त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये यासाठी मी माझ्या कोऱ्या लेटर पॅड वर सह्या करून ठेवलेल्या लेटर पॅडचा गैरवापर करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
खासदार नागेश पाटील आष्टीकर हे काल किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हे दौऱ्यावर आले असता खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी विविध गावांना भेटी देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या त्यातच जलधरा येथील आरती पंडित धनवे या मुलीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने पुढील शिक्षण घेणे अवघड झाले होते.
त्यामुळे पंडित धनवे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर जलधरा येथे भेट देण्यासाठी आले असता पंडित धनवे यांनी माझ्या मुलीला हदगाव येथील आदिवासी वस्तीगृहात विशेष बाब म्हणून प्रवेश देण्यात यावा अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली असता नागेश पाटील आष्टीकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करून विशेष बाब म्हणून या मुलीला त्या हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यात यावा असे सूचित केल्याने त्या मुलीचा पुढील शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी झळकवाडी येथे आदिवासी बांधवांची भेट घेतली असता झळकवाडी येथील माजी सरपंच दामाजी तांबारे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे प्रस्तावनेच्या माध्यमातून येथील अडीअडचणी सांगितल्या आणि येथे विद्यार्थ्यांसाठी शाळेला खोली बांधकामाची मागणी केली असता नागेश पाटील आष्टीकर यांनी तात्काळ खोली बांधकामाला निधी मी उपलब्ध करून देईल असे यावेळी आश्वासन दिले.
त्यानंतर नंदगाव येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आले असता माजी आमदार संतोष टारपे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांची नंदगाव येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यावर जवळपास एक तास चर्चा केली याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोपीनाथ पाटील यांनी माजी आमदार संतोष टारपे यांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अरूण रूणवाल, शिवसेनेचे विधानसभा संघटक. ज्योतिबा खराटे तालुकाप्रमुख मारोती दिवशे पाटील ,माहूरचे तालुकाप्रमुख उमेश जाधव हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख आतूल दर्शनवाड, भुजंगराव पाटील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख प्रकाश गब्बा राठोड राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष गजानन पाटील सोळंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील, राजू घोगरे पाटील, अनुप देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका सचिव गणपत वरजू राठोड, शिवराम जाधव मनोज राठोड शिवसेनेचे नंदू देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.