लोहा| जिल्ह्यात सर्वच तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी ,तलाठी ग्रामसेवक यांनी मिळून सरसगट पंचनामे करावे .शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. कोणीही वंचित राहू नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी असे आहवान माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे
लोहा तालुक्यातील पेनूर शेवडी, पळशी, भेंडेगाव भागातील पिकांच्या नुकसानाची पाहणी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. लोहा तालुक्यात मोठ्या संख्येने मागच्या पावसामुळे मोठे शेतीचे नुकसान झाले त्या संदर्भात आज माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पळशी भेंडेगाव शेवडी पेनुर सह अन्य गावात त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना भेटले त्याच्या व्यस्था जाणून घेतल्या सगळीकडेच परिस्थिती वाईट आहे.
नुकसान झालेल्या सर्व शेतातील पिकांची पंचनामे कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांनी मिळून करावेत तसा अहवाल सादर करावा अशा सूचना प्रशासनास केल्या आहेत. संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे प्रतापरावांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
या भागात पुरामुळे नदीकाठचे शेती खरडून गेली पिके पाण्याखाली आहेत. तेथे जाऊन प्रतापरावांनी शेतकऱ्यांच्या व्यस्था जाऊन घेतल्या. यावेळी गटविकास अधिकारी डी. के. आडेराघो, तालुका कृषी अधिकारी सदानंद पोट पेलवार, मंडळ अधिकारी काठारे, कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक त्या त्या गावातील या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. माजी खासदार चिखलीकर यांच्या सोबत नांदेड दक्षिणचे उमेदवार भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, माजी जि प सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, माजी सभापती खुशाल पाटील पांगरीकर, माजी सरपंच बाबाराव पाटील गवते, बालाजी तमकुटे, सुनील मोरे पंजाबराव देशमुख, शिवदास आप्पा लाटकर, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले यांच्यासह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.