नवीन नांदेड| प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शना खाली दि 07 डिसेंबर 24 रोजी 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, सरपंच मंदाकिनी यंन्नावार, पोलीस पाटील वसंत पल्लेवाड, उपसरपंच दत्ता पाटील कदम व वैद्यकीय अधिकारी आदींच्या उपस्थितीत आरोग्य देवता भगवान धन्वंतरी यांचे पूजन व दिप प्रज्वलन करून संपन्न झाला.
या प्रसंगी दहा रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना CYTB टेस्ट देऊन प्रत्यक्ष रूपानेच उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तसेच 5 रुग्णांना फूड बास्केट वाटप करण्यात आले व स्वइच्छेने आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी CYTB ची टेस्ट करुऊ घेतली, या प्रसंगी डॉ. अमर चव्हाण ,डॉ. मिरदुडे , डॉ. जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे , डॉ. बालाजी राठोड ,डॉ गजानन गुडपे , डॉ.लता मुदिराज, डॉ विवेक पदमने , डॉ अमित रोडे, हसन शेख,जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, तालुकास्तरीय अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.