नांदेड l मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विविध उपक्रम पंधरवड्यातील कार्यक्रमांपैकी एक “चळवळीतला उपेक्षित बाप माणूस” या विविध लढ्याच्या चळवळीतील योद्धाच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्यावर आधारित लेख संग्रहातील संपादित ग्रंथाचे ई प्रकाशन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्याचे आयोजन केले आहे.
“चळवळीतला उपेक्षित बाप माणूस” या ग्रंथाचे ई प्रकाशन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश जिल्हा शाखा आनंद नगर येथील संपर्क कार्यालयातुन होत आहे.याप्रसंगी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे, माजी कुलगुरू उद्धव भोसले, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजीराव कल्याणकर,राजेश पावडे,गोविंद मुंडकर,डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७सप्टेंबर २०२४ रोज मंगळवार दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत आहे.
सौ ललिता बंडे संपादित “चळवतील उपेक्षित बाप माणूस” या ग्रंथाचे ई. प्रकाशन शॉपिजन ही प्रकाशन तर्फे प्रकाशित आणि प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमास चळवळी व सारस्वत प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर शिवदास हमाद यांनी केले आहे.