नांदेड। परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून ३० जुलै रोजी माननीय शहाजी उमाप साहेबांनी पदभार स्वीकारला. ही बातमी नांदेडकराना सुखद धक्का देणारी निश्चितच होती. आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी होती.उमाप साहेबांकडून सर्वसामान्य जनतेला खुप अपेक्षा आहेत.
तसे पहिले तर मागील एक ते दीड महिन्यापासून साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा नांदेडरांना होतीच. परंतु कार्यालयीन अडचणीमुळे थोडा वेळ लागला. मी साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड डॉ.अण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने जयंती चांगली होऊन नवीन पायंडा पडावा यासाठी प्रयत्नशील होतो.
जिल्ह्यातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.त्यामध्ये जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. अबीनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी मा.सुशील कुमार नायक,महापालिका आयुक्त मा. महेश कुमार डोईफोडे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल,अप्पर जिल्हाधिकारी मा. पी.एस.बोरगावकर,निवासी उप जिल्हाधिकारी मा.महेश वडदकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.गिरीष कदम,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा.शिवानंद मिनगिरे आदींसह इतरही मान्यवरांना विनंती करून जयंती मध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवडणूक आयोगाचे महत्वाचे काम असल्यामुळे ते कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत परंतु इतर सर्वच अधिकाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थिती दर्शविली. ही बाब समाजासाठी व मंडळासाठी समाधानकारक व ऐतिहासिक आहे. या त्यांच्या सकारात्मक आगमनामुळे कर्तव्यदक्ष सनदी अधिकाऱ्यांनी सर्वांची मने जिंकलित. पहिल्यांदाच जिल्हा जयंती मंडळाचे ध्वजारोहन निवासी उप जिल्हाधिकारी यांनी केले.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या पथकाने दिलेली सलामी,त्यानंतर घेण्यात आलेले सामूहिक राष्ट्रगीत हे खरोखरचं लक्षवेधी वेधणारे होते.
लोकप्रतिनिधी बरोबर महत्व प्रशासनातील ठोस कारवाई साठी सुप्रसिद्ध असलेल्या अधिकाऱ्यांना दिले गेले. नांदेड परीक्षेत्राचे नूतन पोलीस उप महानिरीक्षक मा.शहाजी उमाप निमंत्रित पाहुणे असताना येऊ शकले नाही याचे दुःख होतेच. परंतु डीआयजी साहेबांनी व्हाट्सअपवर वयक्तिक संदेश पाठवून पुढील कार्यकामात येण्याचे आणि समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. हा संदेश निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी व आदर निर्माण करणारा आहे.
तसे पहिले तर उमाप साहेबांचे अनेकांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत.त्यांचा आणि माझा सन २००९-१० मध्ये जवळून संबंध आला होता. त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार होता. मी “पेड न्यूज” आर्टिकल साठी माहिती रेमन मैग्सेसे पुरस्कार विजेते (आशियाचा नोबेल) “द हिंदू” चे ग्रामीण आवृत्तीचे संपादक माजी राष्ट्रपती यांचे नातू साथी पी.साईनाथ यांना अल्पावधीत उपलब्ध करून दिली होती.
त्यामुळे काही असंतुष्ट लोकांकडून धोका निर्माण झाला होता. तेव्हा उमाप साहेबांनी मला पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता आहे काय विचारणा केली होती. तेव्हा मी नम्रपणे आवश्यकता नसल्याचे कळविले होते. ती घटना जुनी जरी असली तरी आज साहेब येथे रुजू झाल्यामुळे सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. एकंदरीतच जयंती साठी निमंत्रित केल्यावर त्यांचा आलेला संदेश हा आत्मविश्वास वाढविणारा व प्रोत्साहन देणारा आहे.