नांदेड| अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एका २५ दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देऊन पुरावा नॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पित्यास देगलूर न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला २५ दिवसापूर्वी मुलगी झाली. या मुलीच्या पालन पोषणाच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्याघरात भांडण सुरू झाले. अखेर संतप्त झालेल्या शेषराव भुरे याने २५ दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. आणि तिचा मृतदेह पिशवित टाकून लेंडू नदीच्या पात्रात फेकून दिला.
०४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास बागा टाकली जवळील लेंडी नदीच्या पात्रात एका स्त्री जातीचे अभ्रक मयत अवस्थेत असल्याची माहिती देगलूर पोलिसांना मिळाली. या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत दिनांक ०५ रोजी आरोपी महिला व शेषराव भुरे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना देगलूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश अमितसिंह आर मोहने यांनी आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.