नांदेड। नजिकच्या कालावधीत महानगरपालिकेतील जन्म-मृत्यु नोंद विभागाच्या वाढत्या तक्रारी विचारात घेता दिनाक ०३.०७.२०२४ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी बैठक आयोजित करून या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिरोन, डॉ.प्रतिभा कदम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांची उपस्थिती होती.
महानगरपालिके मार्फत निर्गमित होणाऱ्या जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी नागरीकांना विलंब होत असल्याने नागरीकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी तात्काळ आवश्यकत्या उपाययोजना करण्याच्या हेतुने आयुक्तांनी जातीने लक्ष घालुन या बैठकीचे आयोजन करुन अधिकान्याना सुचना केलेल्या आहेत.
वास्तविक पाहता जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र देतांना या विभागामध्ये केंद्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या अशा दोन संगणक अज्ञावलीमध्ये नोंद घेऊन नागरीकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. सालसन २०१६ पुर्वीचे जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र महानगरपालिकेच्या ई मैत्री सॉफ्टवेअर मार्फत निर्गमित करण्यात येते. त्यामुळे सालसन २०१६ पूर्वीचे प्रमाणपत्र वितरणाचे काम आजही चालु आहे.
तथापि, सालसन २०१६ नंतरचे जन्म-मृत्युची बाबत केंद्र शासनाच्या सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टम (सी.आर.एस.) सॉफ्टवेअर या प्रणालीमध्ये नोंद घेऊन प्रमाणपत्र निर्गमित करणे बंधनकारक आहे. परंतु मागील काही दिवसांपासुन या सॉफ्टवेअरचे अद्यावतीकरणाचे (Upgradation) कार्य प्रगतीपथावर असल्याने या कार्यप्रणालीमध्ये सध्या नोंद करता येत नसल्याने प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी विलंब होत असल्याचे यावेळी वैद्यकीय अरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
तसेच सदरील कार्यप्रणालीचे अद्यावतीकरण पूर्ण होत असुन नविन सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करुन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्व तांत्रिक बाबीची पुर्तता झाल्यानंतर नागरीकांना जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असल्याचे यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यानी सांगितले.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टम (सी.आर.एस.) सॉफ्टवेअर या प्रणालीचे अद्यावतीकरण (Upgradation) तातडीने पुर्ण करुन घेऊन जन्म-मृत्यु नोद प्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया तातडीने सुरळीत करण्यात यावी असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच जन्म-मृत्यु विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी सौजन्याने वागुन त्यांची कामे विहीत वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना सुध्दा आयुक्तांनी दिलेल्या आहेत. यादरम्यान मुख्य कार्यालयात जन्म-मृत्यु विभागातील नागरीकांशी उध्दट्टपणे बोलणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरीकांना या सेवेसाठी प्रत्येक कार्यासनावर (Counter) ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरण्याची सुविधा महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
तरी नागरीकांना होणाऱ्या असुविधे बहल आयुक्तांनी खेद व्यक्त करुन सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये दुरुस्तीचे काम तातडीने पुर्ण करुन जन्म-मृत्यु नोंद सेवा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असुन या तांत्रिक दुरुस्तीच्या कालावधीत नागरीकानी संयम बाळगुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले आहे, अशी माहिती जनसंपर्क विभागाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.