नांदेड| तीन एकरच्या परिसरात निसर्गरम्य हरित लता, वेली, वृक्ष, डौलणारी फुलझाडे, विस्तृत पसरलेले गवताचे मैदान, वाढलेली झाडे आणि चिमुकल्यांचा वावर पाहून पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा असे गौरोद्गार रिप बेनिफिट संस्थेने काढले आहेत.


नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी शिक्षकांना भरीव मार्गदर्शन करण्यासाठी रिप बेनिफिट संस्थेच्या चंद्रिका, अक्षय,शिवानी व भरत यांच्यासह समग्र शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विष्णुपूरीस भेट देण्यासाठी आले होते. यावेळी शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी रिप संस्थेच्यावतीने शालेय परिसरात एका बहुवार्षिक रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. रिपने पर्यावरण प्रेमी शिक्षक उदय हंबर्डे यांना पुढील कार्यासाठी निवडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी व कृष्णा बिरादार यांनी शाळेतील पर्यावरणपुरक प्रकल्पांची माहिती दिली. शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले.
