किनवट,परमेश्वर पेशवे। बळीराम पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय किनवट येथे करिअर कट्टा विभागाच्या वतीने करिअर संसद पदाधिकारी शपथविधी सोहळा दिनांक 15 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यवाहक प्रा. अनिल पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्तावना करिअर कट्टा महाविद्यालय समन्वयक डॉ.आनंद भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रा संतोष गोपीचंद पवार यांनी केले.
याप्रसंगी करिअर संसदेतील मुख्यमंत्री म्हणून अनुसया लक्ष्मण पवार, नियोजन मंत्री म्हणून वेदिका अजय जयस्वाल, कायदे व शिस्तपालन मंत्री कृतिका गजानन बारापात्रे, सामान्य प्रशासनमंत्री मेघा भारत आर के, माहिती प्रसारणमंत्री श्रेया बालाजी, जाधव उद्योजकता विकास मंत्री काळे जयश्री प्रकाश, रोजगार स्वयंरोजगार मंत्री योगिता सुभाष चव्हाण, कौशल्य विकास मंत्री साक्षी राम घंटलवार, संसदीय कामकाज मंत्री मोदी गजानन संतोष, सदस्य म्हणून नितीन पांडुरंग बेले यांनी आपल्या पदाची शपथ घेतली महाविद्यालयातील पर्यावरण संरक्षण स्वच्छता परिसर स्वच्छता विद्यार्थ्यांच्या समस्या अशी अनेक कामे महाविद्यालय विकासाकरिता करण्याची शपथ घेतली या प्रसंगी प्रचंड संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा चहा फराळ देण्यात आला.